Shruti Haasan: अभिनेत्री श्रुती हसन हिने अलीकडेच बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय सिनेमात काम करण्याचा अनुभव सांगितला. तिच्या मते, दक्षिणेतील कलाकार बॉलिवूडच्या कलाकारांच्या तुलनेत अधिक विनम्र आणि देवभक्त असतात. साउथ आणि बॉलिवूडमधला फरक एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत श्रुती हसन म्हणाली की दक्षिणेत लोक जास्त जागरूक आणि अध्यात्मिक असतात. दक्षिणेतील अभिनेते नेहमी विनम्र राहतात कारण त्यांना वाटतं की “सरस्वतीचा आशीर्वाद दूर जाऊ नये.” तिने सांगितले की साउथच्या सेटवर परंपरा पाळल्या जातात, जसे की सकाळी नारळ ठेवणे किंवा देवतांची चित्रं ठेवणे. तसेच नियमांचं पालन केलं जातं आणि सर्वजण आपली वागणूक व शिस्त याबद्दल काळजी घेतात. साउथ का आहे विशेष? श्रुतीच्या मते, दक्षिणेत लोक साधेपणावर भर देतात. बरीच संपत्ती असूनही ते साधे कपडे घालतात आणि जुन्या गाड्या वापरतात. तिचं म्हणणं आहे की, “आपण फक्त कलेचे माध्यम आहोत. खरी गोष्ट म्हणजे चांगली फिल्म, कथा किंवा गाणं. आमचं काम म्हणजे ही कला लोकांपर्यंत पोहोचवणं.” श्रुतीने पुढे सांगितलं की संगीत शिकणे आणि दीर्घकाळ लोकांबरोबर काम करणे ह्यामुळे तिला विनम्र राहायला आणि मेहनतीने काम करायला शिकायला मिळालं आहे. श्रुतीचा करिअर प्रवास श्रुती हासनने बॉलिवूडमध्ये ‘लक’, ‘दिल तो बच्चा है जी’ आणि ‘डी-डे’ सारख्या चित्रपटांत काम केलं आहे. अलीकडेच ती रजनीकांतच्या ‘कुली’ या चित्रपटात दिसली, ज्याचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले. हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झाला.