कमल हसनच्या गाण्यावर लेक श्रुती हसनने केला जबरदस्त डान्स

मुंबई -श्रुती हसनचे चित्रपट असोत किंवा सोशल मीडिया पोस्ट्स, अभिनेत्री नेहमीच तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरते. अभिनेत्रीच्या बहुतेक पोस्ट्स कॅमेर्यामागील तिच्या आयुष्याची झलक दाखवतात. श्रुतीने नुकताच टाकलेला व्हिडीओ सर्वांना कमल हसनची आठवण करून देताना दिसत आहे.
श्रुतीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती कमल हसनच्या ‘अपूर्व सगोधरर्गल’ या कॉमेडी चित्रपटातील ‘राजा कैया वाचा’ या लोकप्रिय ट्रॅकवर नाचताना दिसत आहे. ती ज्या पद्धतीने नृत्य करत आहे, ते प्रेक्षकांना भावत आहे. ती या गाण्याचे हुकस्टेप रिक्रिएट करताना दिसत आहे. डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडिओ एका गॅरेजमध्ये शूट केलेला असल्याचे समजते. विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये श्रुती काळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये दिसत आहे. तो एक जंपसूट आहे. यावरून नेटकऱ्यांमध्ये मात्र जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
View this post on Instagram
श्रुती हसनकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. अलीकडेच तिने तुर्कीमध्ये बालकृष्णासोबत तिच्या पुढच्या ‘NBK107’ चित्रपटाचे शेड्यूल पूर्ण केले. याचे दिग्दर्शन गोपीचंद मालिनेनी करत आहेत. याशिवाय ती चिरंजीवीच्या पुढच्या मास एंटरटेनर ‘चिरू154’ च्या सेटवरही दिसली होती. या चित्रपटात अभिनेता रवी तेजाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.





