Shrimant Bhausaheb Rangari: पत्रकार संघातर्फे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती
Shrimant Bhausaheb Rangari:

Shrimant Bhausaheb Rangari: देशातील सार्वजनिक गणेशोत्सव असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती करण्याचा मंगळवारचा बहुमान पुणे श्रमिक पत्रकार संघाला मिळाला. या वेळी संघाचे अध्यक्ष उमेश शेळके यांच्यासह संघाचे पदाधिकारी आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.
याशिवाय श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नेत्या रूपाली चाकणकर, अभिनेते सारंग साठे, अभिनेत्री सई मांजरेकर, ऋता दुर्गुळे, ईशा कोप्पीकर, गौतमी पाटील,
एटीएस पुणेचे पोलीस अधीक्षक संभाजी कदम, पीएनजी ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ, एसीपी विवेक पवार, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपआयुक्त नम्रता पाटील, दीपक केटरर्सचे दीपक मालानी, पोलीस अधीक्षक नारायण शिरगावकर, कर्नल जीतीन थॉमस,
जीएसटी कमिशनर दिनेश भोयर, डीएसपी राजेंद्र कदम, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य गणेश शिरसाट आदींचा समावेश होता. या वेळी कलावंत पथकातर्फे श्रींसमोर स्थिर वादन करण्यात आले.





