“श्रीकांत शिंदेंना मंत्री करा” ; शिंदे गटाच्या सर्वच खासदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Shrikant Shinde । लोकसभा निवडणुकीत केंद्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. उद्या संध्याकाळी 7 वाजता दिल्लीत हा शपथविधी होणार आहे. यानंतर आता मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु झालाय. एनडीएतील घटकपक्षांना 4 खासदारांमध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद असे सूत्र ठरल्याचे सांगण्यात येतंय. त्यानुसार आता शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदामध्ये श्रीकांत शिंदे यांचा समावेश करावा अशी मागणी शिवसेनेच्या सर्व खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलीय.
श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद द्या Shrikant Shinde ।
श्रीकांत शिंदे यांची शिवसेनेचे लोकसभेतील गटनेतेपदी नियुक्ती झाली आहे. आता या तरुण खासदाराला मंत्रिपद द्यावं अशी विनंती शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. काल शिवसेनेच्या सर्व खासदारांची दिल्लीत बैठक झाली. यावेळी या बैठकीत खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे श्रीकांत शिंदे यांच्या मंत्रिपदासाठी आग्रह धरला असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेनेच्या वाट्याला दोन मंत्रिपदं येण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. वरिष्ठ नेत्यांमध्ये कोणताही वाद नको म्हणून काही खासदारांनी ही भूमिका घेतली. शिवसेनेच्या विजयी खासदारांमध्ये बुलढाण्याचे प्रतापराव जाधव, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, हातकणंगलेचे धैर्यशील माने, छत्रपती संभाजीनगरचे संदीपान भुमरे, मुंबई उत्तर पश्चिमचे रविंद्र वायकर असे सर्व वरिष्ठ नेते आहेत.
एकनाथ शिंदे यांना 7 जागा Shrikant Shinde ।
लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 जागांवर विजय मिळवता आला. यामध्ये कल्याणचे श्रीकांत शिंदे, ठाण्याचे नरेश म्हस्के यांच्यासह सात जणांचा समावेश आहे
हेही वाचा
‘तुम्ही सिंहाला जन्म दिलाय’ अमेठीचे खासदार केएल शर्मा यांच्या पत्नीने सोनिया गांधींना सांगितले





