मराठमोळे श्रीकांत दातार हॉर्वर्ड बिझनेस स्कूलचे नवे डीन

मुंबई – हॉर्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीन म्हणजेच अधिष्ठातापदी अर्थतज्ज्ञ श्रीकांत दातार या मराठी माणसाची निवड झाली आहे. १९०८ साली बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे स्थापन झालेली ही संस्था 112 वर्षांची जुनी संस्था असून ती जगातील एक प्रख्यात संस्था मानली जाते. या संस्थेच्या अधिष्ठातापदी मराठी माणसाची निवड होणं ही मराठी जनांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे.
श्रीकांत दातार हे चाटर्ड अकाउंटंट आहेत. आयआयएममधून व्यवस्थापनाचं शिक्षण – स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पीएचडी – कार्नेजी मेलन येथे अध्यापन – पुढे स्टॅनफोर्ड येथे अध्यापन आणि आता हार्वर्ड बिझनेस स्कुलचे डीन असा त्यांचा आजवरचा प्रवास राहिला आहे.
दातार यांची भविष्यात हॉर्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीन म्हणजेच अधिष्ठातापदी दातार यांची निवड झाल्याने महाराष्ट्रातून उत्तीर्ण होऊन जगात मराठीचा झेंडा फडकवणारी अनेक नावं निघू देत अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, हॉर्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये या आधी नितीन नोहरिया हे अधिष्ठाता होते, त्यांच्या जागी दातार यांची निवड झाल्याने या पदावर लागोपाठ दुसऱ्यांदा भारतीय व्यक्तीची निवड झाली आहे.





