करवीर संस्थानचे श्री शाहू छत्रपती महाराजांनी घेतली भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांची भेट
Updated On:

कोल्हापूर – करवीर छत्रपती घराण्याचे लष्कराशी अनेक वर्षांपासूनचे नाते आहे. खासदार संभाजीराजे यांचे आजोबा मेजर जनरल श्री शहाजी छत्रपती महाराज यांनी दुसऱ्या महायुद्धात प्रत्यक्ष सहभागी होऊन हिटरलच्या सैन्याशी लढा दिला होता.
कोल्हापूरच्या करवीर संस्थांचे विद्यमान अधिपती श्री शाहू छत्रपती महाराज यांनी देखील घराण्याचे लष्कराशी असणारे पूर्वापार ऋणानुबंध आजही जोपासले आहेत. श्री शाहू छत्रपती महाराज हे मराठा लाईट इन्फंट्रीचे मानद ‘कर्नल अॉफ दि रेजिमेंट’ म्हणून सन्मानित आहेत.
आज महाराजांनी भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे PVSM, AVSM, SM, VSM, ADC यांची भेट घेतली.. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यासंदर्भात फोटो माध्यमांना देऊन माहिती दिली आहे.





