Shreyas Iyer Statement : वैभव सूर्यवंशीने सरावादरम्यान असं काय केलं की त्याला पदार्पणाची संधी द्यावी लागली? श्रेयस अय्यरने केला खुलासा
Shreyas Iyer Statement : कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकल्यानंतर वैभव सूर्यवंशीचे तोंडभरून कौतुक केले आणि त्याला संघात स्थान का दिले? याचा रंजक खुलासा केला.

Shreyas Iyer Statement on Vaibhav Sooryavanshi Debut : मँचेस्टर येथील ऐतिहासिक टी-२० सामन्यात १५ वर्षीय वंडर बॉय वैभव सूर्यवंशीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून नवा इतिहास रचला आहे. भारताकडून आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला असून, त्याने सचिन तेंडुलकरचा ३७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. मँचेस्टर टी-२० सामन्यात उपकर्णधार तिलक वर्माने त्याला पदार्पणाची कॅप दिली. या ऐतिहासिक पदार्पणानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकल्यानंतर वैभव सूर्यवंशीचे तोंडभरून कौतुक केले आणि त्याला संघात स्थान का दिले? याचा रंजक खुलासा केला.
नेट्समध्ये भारतीय गोलंदाजांना धुवून काढले –
वैभवच्या अफाट प्रतिभेचा गौरव करताना श्रेयस अय्यर म्हणाला, “गेल्या काही महिन्यांत तुम्ही त्याची फलंदाजी पाहिली आहे. तो प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी पूर्णपणे पात्र होता. नेट्समधील सरावादरम्यान त्याने आमच्या सर्व प्रमुख गोलंदाजांची आक्रमकपणे फलंदाजी करत चांगलीच धुलाई केली. त्याचे हे रूप पाहून आम्ही थक्क झालो. वैभवची सर्वात मोठी ताकद म्हणजे तो मैदानावर अजिबात दडपण घेत नाही. त्याचा स्वभाव अतिशय शांत असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आव्हानांना कसे सामोरे जायचे, याची त्याला पूर्ण जाणीव आहे.”
The moment Shreyas Iyer announced Vaibhav Sooryavanshi’s HISTORIC international debut! 🇮🇳 pic.twitter.com/b1dHf6bnz5
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 4, 2026
टी-२० वर्ल्ड कपच्या ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ला डच्चू –
The start of a special chapter ✨
A proud moment as Vaibhav Sooryavanshi receives his #TeamIndia cap from Vice-Captain Tilak Varma 🧢
Updates ▶️ https://t.co/WYfL8tAm58 #ENGvIND pic.twitter.com/zpLtixYDgM
— BCCI (@BCCI) July 4, 2026
नुकत्याच संपलेल्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरलेल्या संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमधून ड्रॉप करून वैभवला संधी देण्यात आली आहे. संजूला गेल्या तीन सामन्यांतील अपयश महागात पडले. यावर बोलताना अय्यर म्हणाला, “भारतीय संघात सध्या प्रचंड स्पर्धा आहे. संघात अफाट टॅलेंट असणे ही चांगली गोष्ट आहे आणि हेच दडपण आम्हा खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरित करते.”
भारताची प्लेइंग इलेव्हन: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हर्षित राणा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन: फिल सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर, जोश टंग.





