Shreyas Iyer : पंजाबला प्लेऑफमध्ये पोहोचवत श्रेयसने रचला इतिहास! रोहित-धोनीला जे जमलं नाही, ते करून दाखवलं

Shreyas Iyer Leads Punjab Kings to IPL 2025 Playoffs : रविवार १८ मे रोजी आयपीएल २०२५ मध्ये डबल हेडर सामना खेळवण्यात आला. जिथे संध्याकाळी गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आणि आरसीबी आणि पंजाब किंग्जसह प्लेऑफमध्ये दणक्यात एन्ट्री मारली. पहिल्या सामन्यात, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली, पंजाबने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आणि प्लेऑफसाठी स्वतःला मजबूत केले. नंतर, गुजरातने उर्वरित काम पूर्ण केले आणि पंजाबचा संघ प्लेऑफमध्ये दाखल झाला. या दरम्यान पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने एक खास पराक्रम केला.
श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये रचला इतिहास –
राजस्थान रॉयल्सचा १० धावांनी पराभव करून पंजाब किंग्ज प्लेऑफच्या जवळ पोहोचले होते. यानंतर, गुजरातने दिल्लीला हरवताच, पंजाबला प्लेऑफचे तिकीट मिळाले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली शानदार कामगिरी करत पंजाबने १० वर्षांनंतर आयपीएल प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. पंजाब किंग्ज प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर, कर्णधार श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणून एक अनोखा विक्रम रचला आहे. तो प्लेऑफमध्ये तीन वेगवेगळ्या संघांना पोहोचवणारा पहिला कर्णधार बनला आहे. याआधी कोणत्याही कर्णधाराला आयपीएलमध्ये एवढी मोठी कामगिरी करता आलेली नाही.
Shreyas Iyer – the first captain to lead three different teams to the IPL playoffs.
Should he be in the mix for India captaincy as well?#IPL2025 #IPL #ShreyasIyer #DC #KKR #PBKS pic.twitter.com/SmudTB2cpx
— Circle of Cricket (@circleofcricket) May 19, 2025
तीन संघांना प्लेऑफमध्ये पोहोचवणारा पहिलाच कर्णधार –
Shreyas Iyer #shreyasiyer #iplauction2024 pic.twitter.com/fI8gmgMDsk
— RVCJ Sports (@RVCJ_Sports) May 19, 2025
श्रेयस अय्यरने पंजाब किंग्ज संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यापूर्वी, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सनाही प्लेऑफमध्ये पोहोचवले होते. अय्यरने आपल्या नेतृत्त्वाखी दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल २०२० च्या अंतिम फेरीत पोहोचवले होते, पंरतु त्याचा संघ जेतेपद जिंकण्यात अपयशी ठरला होता. गेल्या हंगामात, त्याच्या नेतृत्वाखाली, कोलकाता संघाने केवळ प्लेऑफमध्ये प्रवेशच केला नाही तर आयपीएलचे जेतेपदही जिंकले. आता अय्यरकडे पंजाबला चॅम्पियन बनवण्याची उत्तम संधी आहे. याआधी पंजाबने एकदाही जेतेपद पटकावलेले नाही.
हेही वाचा – DC vs GT : ‘बहुत मारा बे धागा ही खोल दिया…’, जैस्वालने धुलाई केल्यानंतर अर्शदीपने शेअर केला VIDEO
दुखापत होऊनही अय्यर उतरला होता खेळायला –
सामन्याच्या एक दिवस आधी सराव सत्रादरम्यान अय्यरच्या तर्जनीला खोल दुखापत झाली होती. असे असूनही, त्याने राजस्थान संघाविरुद्ध खेळण्याचा निर्णय घेतला. जेव्हा तो टॉससाठी मैदानात आला, तेव्हा त्याच्या बोटाला जाड पट्ट्या बांधलेल्या होत्या. दुखापतीची तीव्रता पाहता, अनेकांना अशी अपेक्षा होती की अय्यर या महत्त्वाच्या सामन्यात फलंदाजी करणार नाही, परंतु कर्णधाराने केवळ मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला नाही तर आपल्या फलंदाजीने संघाच्या धावसंख्येतही महत्त्वपूर्ण योगदान दिले.





