Shreyas Unwanted Records : टी-२० मध्ये आयर्लंडकडून पराभव, तर वनडेत थेट ‘गोल्डन डक’! कर्णधार श्रेयस अय्यरचे पदार्पण ठरले अत्यंत कटू; भारतीय चाहत्यांची घोर निराशा
Shreyas Iyer Unwanted Records : श्रेयस अय्यरला पहिल्यांदाच भारताच्या एकदिवसीय संघाचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली, आणि तो पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. यापूर्वी, कोणताही भारतीय कर्णधार आपल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात शून्यावर बाद झाला नव्हता.

Shreyas Iyer Unwanted ODI Captaincy Debut Record Golden Duck India vs New Zealand : भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कर्णधारपदाची सुरुवात अत्यंत कटू ठरली आहे. यापूर्वी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचे पदार्पण करताना त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. आता शुबमन गिलच्या गैरहजेरीत पहिल्यांदाच एकदिवसीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली असता, अय्यरला आपले खातेही उघडता आले नाही. एकदिवसीय कर्णधारपदाच्या पदार्पणात शून्यावर बाद होणारा तो भारताचा पहिलाच कर्णधार ठरला आहे.
पहिल्याच चेंडूवर गोल्डन डक; आयुष्यभर लक्षात राहणारी कटू आठवण
न्यूझीलंडविरुद्धचा हा चौथा एकदिवसीय सामना भारतीय संघासह स्वतः श्रेयस अय्यरसाठी आयुष्यभर न विसरता येणारा घाव देऊन गेला आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीय कर्णधारावर पदार्पणाच्या सामन्यात भोपळा फोडण्यात अपयशी ठरण्याची वेळ आली नव्हती. विशेष म्हणजे, श्रेयस केवळ शून्यावर बाद झाला नाही, तर तो पहिल्याच चेंडूवर ‘गोल्डन डक’चा बळी ठरला, ज्यामुळे या विक्रमाची कटुता अधिकच वाढली आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीचाही ‘तो’ जुना विक्रम मागे पडला –
👉 Rohit Sharma – 0 (1)
👉 Virat Kohli – 0 (4)
👉 Shreyas Iyer – 0 (1)
👉 Ishan Kishan – 27 (53)
👉 Kuldeep Yadav – 1 (4)
👉 Gurnoor Brar – 2 (13)Matt Henry was on fire after taking a triple-wicket maiden in the first over, finishing with a career-best 6-27. 🔥
#NZvIND https://t.co/AF342IBLxl
— Green Team (@GreenTeam1992) November 13, 2026
या सामन्यापूर्वी एकदिवसीय कर्णधारपदाच्या पदार्पणात सर्वात कमी धावा करण्याचा भारतीय विक्रम रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नावावर होता. रोहित आणि विराट जेव्हा पहिल्यांदा एकदिवसीय सामन्यात कर्णधार म्हणून मैदानात उतरले होते, तेव्हा दोघेही प्रत्येकी २ धावांवर बाद झाले होते. मात्र, गोल्डन डकवर बाद होत अय्यरने या दोघांनाही मागे टाकले असून आजवर कोणत्याही गोलंदाज कर्णधाराच्या नावावरही अशी नामुष्की नोंदवली गेली नव्हती.
मॅट हेन्रीच्या पहिल्याच षटकातील धक्क्यातून भारत सावरलाच नाही –
𝗜𝗻𝗱𝗶𝗮 𝗨𝗻𝗱𝗲𝗿 𝗦𝗵𝗿𝗲𝘆𝗮𝘀 𝗜𝘆𝗲𝗿
▸ For 1st time, Lost vs Ireland in Intl
▸ For 1st time, Lost Series v Ireland
▸ For 1st time, India went winless in five, Six, Seven consecutive T20I matches
▸ For 1st time, Lost by 100+ runs Margin in T20I
▸ Registered Biggest Defeat in T20I (125 runs)
▸ Registered 2nd Biggest Defeat in T20I (87 runs)
▸ Registered 2nd Lowest T20I Score (76/10)
▸ After 12yrs, Lost T20I Series v ENG
▸ After 7yrs, Lost Back to Back T20I Series
▸ For 1st time, Lost an Intl match at Bristol
▸ 1st time, Conceded 200+ Partnership in T20I
▸ 1st time, Conceded 250+ Total in T20I
▸ Lost No.1 T20I Ranking after 1605 days
▸ 1st time Lost 4 matches in a Single T20I Series/Tournaments
▸ 1st time, Lost Back to Back bilateral T20I Series without winning any match
▸ For 1st time, Failed to Defend more than 225+
▸ India Conceded 250+ Thrice, All under him
▸ India Conceded their Highest T20I total (259)
▸ After 7yrs, Lost T20I match in Newzealand
▸ 1st time lost T20I match at Auckland
▸ After 17yrs, India have lost back-to-back T20Is against NZ in a bilateral series!
.
▸ Registered their 2nd Biggest ODI Defeat (244)
▸ Registered Lowest Score in NZ ODIs (89)
▸ After 16yrs, India got all-out under 90To be Continued….
— 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) November 13, 2026
न्यूझीलंडने उभारलेल्या ३३३ धावांचा पाठलाग करताना मॅट हेन्रीने पहिल्याच चेंडूवर रोहित शर्मा, पाचव्या चेंडूवर विराट कोहली आणि शेवटच्या चेंडूवर श्रेयस अय्यरला बाद करत भारताचा स्कोर ० बाद ३ असा केला; या धक्क्यातून टीम इंडिया शेवटपर्यंत सावरू शकली नाही. ज्यामुळे भारताला 244 धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.





