Jinilaya Deshmukh : श्रावणी सत्या पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला! जिनिलियाने केली वेड २ ची घोषणा

Jinilaya Deshmukh : जिनिलया देशमुख आणि रितेश देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला वेड चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटातील लव्ह स्टोरी प्रेक्षकांना खूप आवडली. या चित्रपटाबातत एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्री जिनिलियाने चित्रपटाबाबत मोठा खुलासा करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
लवकरच २०२२ मध्ये रिलीज झालेल्या वेड या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जिनिलियाने वेडच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणून रितेश आणि जिनिलिया नेहमी चर्चेत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते सतत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. एका मुलाखती दरम्यान विचारलेल्या प्रश्नावर जिनिलियाने वेड २ वर काम सुरू होणार असल्याचे सांगितले आहे.
मुलाखतीत जिनिलीयाला ‘वेड’च्या दुसऱ्या भागावर प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना जिनिलिया म्हणाली, वेड 2’वर सध्या काम सुरू आहे. मात्र यासाठी एक किंवा दोन वर्ष लागतील. यामुळे पुन्हा एकदा स्वीट कमल वेड २ द्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘वेड’ या चित्रपटात एक सुंदर लव्ह स्टोरी दाखविण्यात आली होती. श्रावणी आणि सत्याच्या जोडीने महाराष्ट्राला वेड लावलं होतं. या चित्रपटात सलमा्न खानचाही भन्नाट डान्स होता. बॅाक्स अॅाफिसवरही चित्रपटाने मोठी कमाई केली होती. अलिकडेच जिनिलीया ‘तारे जमीन पर’ चित्रपटात काम केले आहे. 20 जूनला रिलीज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद मिळत असून अभिनेत्रीच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे.
हेही वाचा : ‘प्राजक्तकुंज’ला २ वर्ष पूर्ण; अभिनेत्रीचे खास सेलिब्रेशन





