श्रद्धा कपूरचा ‘स्त्री 2’ चित्रपट ‘देवरा’ला देतोय तगडी टक्कर

Devara Box Office Collection | ज्युनियर एनटीआरचा ‘देवरा पार्ट वन’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याच्या कलेक्शनमध्ये घट झाली. तर दुसरीकडे अभिनेत्री श्रद्धा कपूरचा ‘स्त्री 2’ चित्रपट अद्यापही तुफान कमाई करत आहे.
‘स्त्री 2’ ने 46व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करत असताना ‘देवरा’चे हिंदी व्हर्जन बॉक्स ऑफिसवर मागे पडले आहे. ‘देवरा’मध्ये ज्युनियर एनटीआर दुहेरी भूमिकेत दिसत आहे, तर चित्रपटात जान्हवी कपूर आणि सैफ अली खान देखील आहेत. या चित्रपटाद्वारे दोन्ही बॉलिवूड कलाकारांनी तेलुगूमध्ये पदार्पण केले आहे. मात्र, ‘देवरा’ रिलीज झाल्यानंतर पहिल्या वीकेंडची कमाई चांगली असली तरी दीड महिन्यानंतरही ‘स्त्री 2’ची कमाल जादू पाहायला मिळत आहे..
देवरा चित्रपटाची पहिल्या दिवशी 82.5 कोटींची कमाई
देवरा चित्रपटाने पहिल्या दिवशी 82.5 कोटींची कमाई केली. मात्र हिंदी व्हर्जनमध्ये हा चित्रपट 10 कोटींचा आकडाही पार करू शकला नाही. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटानं फक्त 38.2 कोटींची कमाई केली. सध्या समोर आलेल्या आकड्यांवरून हे समोर आलं आहे की रविवारी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी केलेली नाही. तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं 40.3 कोटींचं कलेक्शन केलं. त्यासोबत चित्रपटानं एकूण कमाई की 161 कोटींची कमाई केली. तर देवरानं ओपनिंग वीकेंडला जगभरात 250 कोटींची कमाई केली आहे.
गेल्या अनेक आठवड्यांपासून वीकेंडला ‘स्त्री 2’ ची कमाई चांगली झाली आहे. देशभरात 45 दिवसांत ‘स्त्री 2’ चे एकूण कमाई 698.35 कोटी रुपये आहे. तर 45 व्या दिवशी ‘स्त्री 2’ ने बॉक्स ऑफिसवर 2.10 कोटींचं बॉक्स ऑफिसवर कलेक्शन केले आहे.





