2020 ला सेलिब्रिटी वेडींग इयर म्हणून घोषित केले तरी वावगं ठरणार नाही. नेहा कक्कड, आदित्य नारायण, पुनीत पाठक, क्रिकेटर युजवेंद्र चहल नुकतेच लग्न बंधनात अडकले. येणाऱ्या काळातही बॉलीवूडची बरीच मंडळी लग्नबंधनात अडकणार आहे.
लवकरच अभिनेता शक्ती कपूरच्या घरातही सनई चौघडे वाजणार आहेत. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ प्रियांक शर्मा लवकरच शाजा मोरानीबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. प्रियांकचा नुकताच शाजाबरोबर साखरपुडा आटोपला आहे. प्रियांक आणि शाजाचा साखरपुडा संपूर्ण कुटुंबाच्या उपस्थितीत धुमधडाक्यात पार पडला. शाजा मोरानी सुप्रसिद्ध प्रोड्यूसर करीम मोरानीची मुलगी आहे.
तसेच प्रियांक शर्मा हा श्रद्धा कपूरचा मावसभाऊ असून 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेंचा मुलगा आहे. आई पद्मिनी मुलाच्या लग्नाची जोरदार तयारी करताना दिसत आहेत. पद्मिनी कोल्हापुरे श्रद्धा कपूरची आई शिवांगी कपूरची धाकटी बहीण आहे. श्रद्धा कपूरचा सख्खा भाऊ सिद्धांत कपूरने प्रियांकच्या साखरपुड्याची फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत. पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात प्रियांक आणि शाजा लग्नबंधनात अडकतील असा अंदाज आहे.