श्रद्धा कपूरने दुखापतीनंतर दिली हेल्थ अपडेट; शेअर केला Video

Shraddha Kapoor Health Update | अभिनेत्री श्रद्धा कपूरला ‘ईठा‘ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर चाहत्यांकडून देखील चिंता व्यक्त करण्यात आली. आता तिने स्वत: व्हिडीओ शेअर करत हेल्थ अपडेट दिलं आहे.
श्रद्धाने व्हिडीओ शेअर करत तिच्या पायाची दुखापतही दाखवली. तिच्या पायाला प्लॅस्टर लावलेलं दिसत आहे. यावेळी चाहत्यांशी संवाद साधत तिने सांगितले की, “माझ्या पायाची दुखापत कशी आहे? हे बघा… टर्मिनेटरसारखी फिरत आहे. स्नायूंना दुखापत झाली आहे. पण लवकरच ठीक होईल. थोडी विश्रांती घ्यायला सांगितली आहे. मी नक्की बरी होईन.” यावर श्रद्धाच्या चाहत्यांनी ‘लवकर बरी हो’ अशी प्रार्थना केली आहे. तसेच तिला काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. Shraddha Kapoor Health Update |
View this post on Instagram
दरम्यान, याच महिन्यात ‘ईठा’ सिनेमाचं शूट सुरु झालं होतं. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांच्यासारखी दिग्गज व्यक्तिरेखा पडद्यावर साकारणं आणि त्याप्रकारे उत्तम नृत्य करणं हे नक्कीच आव्हानात्मक आहे. हेच आव्हान पेलताना नाशिकजवळील एका गावात शूट सुरू असताना लावणी सीक्वेन्सवेळी श्रद्धाचा पाय फ्रॅक्चर झाला. यामुळे सिनेमाची टीम मुंबईत परत आली. आता श्रद्धाला दोन आठवड्यांसाठी आराम करण्याचा सल्ला दिला असून नंतर ती पुन्हा शूटला सुरुवात करणार आहे. Shraddha Kapoor Health Update |
श्रद्धा कपूर लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘ईठा‘ सिनेमात पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध लावणी आणि तमाशा कलाकार विठाबाई नारायणगांवकर यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित आहे. विठाबाई नारायणगांवकर यांना दोन वेळा त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारही मिळाला होता. त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. Shraddha Kapoor Health Update |
हेही वाचा:
शेअर बाजाराची सुरुवात स्थिर! सेन्सेक्स १३७ अंकांनी वधारला तर निफ्टीने २६,११३ ओलांडले





