नगर – नगर शहरातील प्रत्येक नागरिकाने शहराबद्दल प्रेमाची भावना दाखविणे गरजेचे आहे. राजकीय स्वार्थासाठी नगर शहराला बदनाम करणा-यांच्या पाठीमागे जावू नका, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन आ. संग्राम जगताप यांनी नगरकरांना केले.
प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक संपत बारस्कर, डॉ.सागर बोरुडे, नगरसेविका दिपाली बारस्कर, मिनाताई चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या सुमारे 5 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचा शुभारंभ भिस्तबाग चौक येथे आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास महापौर बाबासाहेब वाकळे, मोहन मानधना, नगरसेवक गणेश भोसले, संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, विनीत पाऊलबुद्धे, मनोज दुल्लम, सुनील त्रिंबके, दीपाली बारस्कर, मिना चव्हाण, शीतल जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, बाळासाहेब बारस्कर, निखिल वारे, शिवाजी चव्हाण, उदय कराळे, सतिष शिंदे, बाळासाहेब पवार, सतिष ढवण, स्वप्निल ढवण, अजिंक्य बोरकर, हभप तुळशीराम लबडे महाराज, बाबासाहेब गाडळकर, मायाताई कोल्हे आदींसह नागरिक उपस्थित होते. आ. जगताप पुढे म्हणाले की, शहराचा विकास आणि तरुणांच्या हाताला काम हाच अजेंडा समोर ठेवून आपण काम करत आहोत.