संयुक्त जनता दलाच्या उमेदवारावर गोळीबार
Updated On:

इंफाळ, (मणिपूर) – मणिपूरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केशेत्रिगाव या मतदारसंघातील संयुक्त जनता दलाच्या उमेदवारावर काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी काल गोळीबार केला. रोहित वाहेंगबाम यांच्यावर हा गोळीबार झाला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे.
बाहेंबान यांच्यावर हा गोळीबार कोणी केला हे समजू शकलेले नाही. मात्र या हल्लेखोरांना पकडण्यात यायला हवे. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून करण्यात आला असावा, असे वाहेंगबाम यांच्या मातोश्री सुरबाला देवी यांनी म्हटले आहे.
मणिपूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील आघाडी पुन्हा एकदा सत्ता संपादन करण्यासाठी उत्सुक आहे. तर कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील 6 पक्षांची आघाडी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा पराभव करून सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.





