Mumbai : धक्कादायक..! मुंबईत भरदिवसा महिलेची गोळ्या घालून हत्या
Updated On:

Mumbai – मुंबईतील गोवंडी परिसरात मंगळवारी दुपारी एका १९ वर्षीय महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहीतीनुसार, रस्त्यावरून जात असताना महिलेवर गोळीबार करून हल्लेखोर पळून गेले आहेत.
महीलेला जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले. महिलेचे नाव उघड करण्यात आले नाही. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून, अधिक तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.





