धक्कादायक ! काळमांडवी धबधब्यावर पर्यटनास गेलेल्या 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

पालघर : ऐन दिवाळीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवाळी असल्यामुळे बऱ्याच लोकांना सुट्टी असते. याच सुट्टीचा आनंद घेण्यासाठी काही लोक ट्रिप प्लॅन करत असतात. याच सुट्टीमध्ये पर्यटनासाठी जाणे २ तरुणांच्या जीवावर बेतले आहे. यामध्ये काळमांडवी धबधब्यावर पर्यटनास गेलेल्या 2 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
काय घडले नेमके?
अखिलेश रामदेव मिश्रा (27) आणि खुर्शीद मुस्ताक अहमद नाईक (31) अशी बुडून मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. ते बोईसर मधील रहिवासी आहेत. दिवाळी सणाचा आनंद लुटण्यासाठी बोईसरवरुन जव्हारच्या काळ मांडवी धबधब्यावर ५ जण गेले होते. त्यांच्यातील दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
ऐन दिवाळीत ही दुर्दैवी घटना घडल्याने या तरुणांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जव्हारचा काळमांडवी धबधबा हा धोक्याचा धबधबा असून या ठिकाणी दरवर्षी अशा घटना घडत असतात.





