#BabaKaDhaba प्रकरणाला पुन्हा धक्कादायक वळण ! कांता प्रसाद यांचा यूट्युबर्सवर गंभीर आरोप

मुंबई – गेल्या 1 वर्षात ‘बाबा का ढाबा’ चालवणाऱ्या कांता प्रसाद खूप चर्चेत आले होते. सोशल मीडियाच्या मदतीने बाबा रातोरात लक्षाधीश झाले आणि त्यांचा रस्त्यावरचा ‘बाबा का धाबा’ रेस्टॉरंटमध्ये शिफ्ट झाला.
पण लॉकडाऊनच्या फाटक्यामुळे आता बाबा पुन्हा आपल्या रस्त्यावरच्या ढाब्यावर परत आले आहेत. मात्र लॉकडाऊनच्या फाटक्यामुळे कांता प्रसाद यांनी झोपेच्या गोळ्यांचे सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.यानंतर पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु होता.
या प्रकरणातील तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. डीसीपी अतुल कुमार ठाकुर यांनी सांगितलं आहे की,’ रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी कांता प्रसाद यांनी पोलिसात जबाब नोंदवला होता. अनेक यूट्युबर्स गौरव वासनची माफी मागण्यासाठी दबाव टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे मानसिक तणावात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. या प्रकरणी आतापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र, कांता प्रसाद यांना त्रास देणाऱ्या यूट्युबर्सची पोलीस चौकशी करत आहेत.’
ते पुढे म्हणाले,मालक कांता प्रसाद यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, बाबाने नवीन रेस्टॉरंटचा श्री गणेशा दिल्लीच्या मालवीय नगर मध्ये केला होता.मात्र, आता त्यांच्यावर व्यवसायाला पुन्हा एकदा लॉक डाउन फटका बसला आहे. पुन्हा बाबा का ढाबा रेस्टॉरंट बंद करून जुन्याच जागेवर आले. सोशलवर पुन्हा एकदा त्याचे रेस्टॉरंट बंद पडल्याच्या पोस्ट व्हायरल झाली.
व्हायरल पोस्ट नुसार गेल्या फेब्रुवारीमध्ये त्यांचे नवीन रेस्टॉरंट बंद झाले. आता ते पुन्हा जुन्या ढाब्यावर आले आहेत.याच ठिकाणहून त्यांच्या खाद्यपदार्थांना मोठी मागणी वाढली होती. मात्र, लॉकडाऊनने त्यांच्या खपामध्ये मोठी घट झाली आहे. यामुळे खर्च परवडत नसल्याने त्यांना हे रेस्टॉरंट बंद करावे लागल्याचे व्हायरल होत आहे.





