‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली.. बाबावर आली रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ’

नवी दिल्ली – ‘बाबा का ढाबा’च्या मालकाचा युट्यूबवर भावनिक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते कमालीचे प्रसिद्धि झोतात आले होते. त्यांचा दोन दिवसांपूर्वी आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यात बाबा का ढाबा चे मालक कांता प्रसाद यांनी नवीन रेस्टॉरंट उघडले होते.
बाबाने या नवीन रेस्टॉरंटचा श्री गणेशा दिल्लीच्या मालवीय नगर मध्ये केला होता. याबाबत मात्र, आता त्यांच्यावर व्यवसायाला पुन्हा एकदा लॉक डाउन फटका बसला आहे. पुन्हा बाबा का ढाबा रेस्टॉरंट बंद करून जुन्याच जागेवर आले आहेत. सोशलवर पुन्हा एकदा त्याचे रेस्टॉरंट बंद पडल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहे.
व्हायरल पोस्ट नुसार गेल्या फेब्रुवारीमध्ये त्यांचे नवीन रेस्टॉरंट बंद झाले. आता ते पुन्हा जुन्या ढाब्यावर आले आहेत. याच ठिकाणहून त्यांच्या खाद्यपदार्थांना मोठी मागणी वाढली होती. मात्र, लॉकडाऊनने त्यांच्या खपामध्ये मोठी घट झाली आहे. यामुळे खर्च परवडत नसल्याने त्यांना हे रेस्टॉरंट बंद करावे लागल्याचे व्हायरल होत आहे.
याबाबत त्यांना बाबांना विचारले असता त्यांनी सांगितले, देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका सर्व लोकांसह माझ्या व्यवसायावर ही बसला. मी नवीन व्यवसाय सुरु केला होता, तो तीन महिन्यांतच बंद झाला. यामध्ये त्यांनी 5 लाख रुपये गुंतविले होते, काही कर्मचारी नोकरीवर ठेवले होते. भाडे 35000 रुपये, वीज पाण्यासाठी 15000 रुपये खर्च होत होते. मात्र, विक्री 40000 हून अधिक होत नव्हती. यामुळे नुकसानीत होतो, असे बाबा यांनी सांगितले.’





