धक्कादायक ! अमरावतीमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

अमरावती : अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये प्रेमप्रकरणातून एका तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे 27 वर्षीय मृत तरुणाने काही दिवसांपूर्वीच पोलीस भरतीची परीक्षा दिली होती.
काय घडले नेमके?
निलेश प्रकाशराव गुजर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव होते. तो आपल्या मावशीच्या घरी दर्यापूर येथे सिविल लाईन परिसरात मागील पंधरा वर्षापासून राहत होता, येथेच त्याने आपले महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण केले. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी त्याने पोलीस भरतीची परीक्षा सुद्धा दिली होती. यानंतर त्याने अचानक काल शुक्रवार रोजी घरातील सर्व सदस्य शेगावला दर्शनासाठी गेल्यानंतर निलेशने आपल्या प्रेयसीला व्हिडिओ कॉल केला. या कॉलनंतर त्याने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला.
निलेशच्या कुटुंबीयांनी प्रेयसीवर केले गंभीर आरोप
निलेश आणि त्याच्या प्रेयसीमध्ये यावेळी नेमकं काय बोलणं झालं, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र, प्रेयसीसोबत संपर्क झाल्यानंतरच निलेशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. निलेशची प्रेयसी ही त्याला वारंवार पैशांची मागणी करत होती, तसेच मानसिक त्रास देत होती असा आरोप त्यांनी केला आहे.




