Accident News : धक्कादायक ! मनमाडमध्ये ट्रकखाली चिरडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मनमाड : शाळा सुटल्यानंतर दहावीचे दोन विद्यार्थी दुचाकीवरून घराकडे परतत असताना मोकाट जनावरेमध्ये आल्याने ट्रकच्या मागच्या टायरखाली चिरडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. चांदवड- मनमाड मार्गावर सोमवारी दुपारी हा अपघात झाला. आदित्य मुकेश सोळसे (16 मू. रा. छत्रपती संभाजीनगर) व वैष्णवी प्रवीण केकाण (16, दोघे रा. हनुमाननगर) अशी मृतांची नावे आहेत.
दोघेही दरेगाव रस्त्यावर असलेल्या स्वामी विवेकानंद शाळेत शिकत होते. आदित्य सोळसे हा हनुमाननगर येथे मामाच्या घरी रहायला होता तर त्याचे आई-वडील हे छत्रपती संभाजीनगर येथे रहायला असून त्याला एक भाऊ आणि एक बहीण आहे. दरम्यान, पोलिसांनी ट्रकचालक राकेश दादाजी खैरनार (रा कौळाणे, ता. मालेगाव) यास ताब्यात घेतले आहे.
मनमाड शहरात गेल्या काही वर्षांपासून मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काहीवेळा सांडांनी मारल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, यावर अजूनही कुणाचेही नियत्रंण नाही.





