Maharashtra Epstein Files Second teaser : अनामिका कापल्याचा धक्कादायक सीन, कारच्या डिक्कीत नोटांचे बंडल; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा दुसरा टीझर चर्चेत
Maharashtra Epstein Files Second teaser : टीझर पाहून या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता चित्रपटाच्या ट्रेलरकडे लक्ष लागले आहे.

Maharashtra Epstein Files Second teaser : नाशिक येथील भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात एकच खळबळ उडवून दिली. या प्रकरणावर राजकीय वातावरण देखील प्रचंड तापले होते. या सत्य घटनेवर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. यानंतर आता चित्रपटाची दुसरी झलक अर्थात दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
टीझर पाहून या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता चित्रपटाच्या ट्रेलरकडे लक्ष लागले आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिपाली सय्यद महत्वाच्या भूमिकेत असून तिची झलक लक्ष वेधून घेत आहे. यासोबत कॅप्टन अशोक खरातची भूमिका कोणता अभिनेता साकारणार याविषयी देखील चर्चा रंगली आहे. दुसऱ्या टीझरमध्ये त्याची झलक दिसते पण ही भूमिका साकारणारा अभिनेता कोण आहे हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
सोशल मीडियावर असलेल्या चर्चेनुसार, खरातची भूमिका मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर साकारणार असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याशिवाय अभिनेता अक्षय टांगसाळे देखील महत्वाची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. येत्या २ ऑक्टोबर २०२६ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
आनंदी पिक्चर्स अमरावती आणि सचिन रोरे पाटीलसह फ्लेमिंगो क्रिएशन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड प्रस्तुत चित्रपटाची निर्मिती केली आहे, दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत दिग्दर्शन करीत आहेत. सध्या या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा असून सध्या सोशल मीडियावर ‘कोणाच्या डोक्यावर बॉम्ब लागणार…?’, असा आशय लिहत या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. दरम्यान, ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहीली असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे.





