धक्कादायक ! विहिरीच्या कामासाठी लाच मागितली म्हणून सरपंचाचे अनोखे आंदोलन; पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उडवले दोन लाख

Updated On:
धक्कादायक ! विहिरीच्या कामासाठी लाच मागितली म्हणून सरपंचाचे अनोखे आंदोलन; पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उडवले दोन लाख

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून कालपासून एकापाठोपाठ एक धक्कादायक  बातम्या समोर येत आहेत, त्यातच याठिकावरून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात विहिरीच्या कामासाठी लाच मागितली म्हणून एका सरपंचाचा संताप झाला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी चक्क  दोन लाख रुपये पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उडवले आहेत. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.

भ्रष्ट अधिकारी विहिरीच्या कामासाठी लाच मागत असल्याचा आरोप करत या सरपंचाने दोन लाख रुपयांच्या नोटा कार्यालयाच्या बाहेर हवेत उडवल्या आहेत. विहिरीसाठी लाच मागत असल्याचा आरोप करत गेवराई पायगा येथील मंगेश साबळे या सरपंचाने गावातील शेतकऱ्यांकडून दोन लाख रुपये गोळा केले होते.

त्यानंतर फुलंब्री पंचायत समिती समोर या नोटांच्या बंडलाचा हार गळ्यात घालून त्यातील नोटा हवेत उडवत मंगेश साबळे यांनी आंदोलन केले आणि अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवला.

या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून त्यामध्ये सरपंच मंगेश साबळे हे दोन लाख रुपये हवेत उडवताना दिसत आहेत. यावेळी साबळे यांनी जोरजोरात घोषणाबाजी  करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

2026-10-08 16:41:41

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

2026-10-08 15:47:48

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका