Ayesha khan : ‘धुरंधर’फेम अभिननेत्रीचा शॅाकिंग खुलासा; बॅालीवूडमध्ये खळबळ! म्हणाली “माझ्यासोबत…”
Ayesha khan : धुरंधरफेम अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला असून, यामुळे बॅालीवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

Ayesha khan : बॅालीवूड इंडस्ट्रीतील अभिनेत्रींना प्रसिद्ध मिळण्याअगोदर त्यांना अनेक गोष्टींचा सामाना करावा लागतो. वाईट प्रसंगाना सामोरे जात आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करावी लागते. याबाबत इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींनी मुलाखतीत खुलासा करत त्यांच्या आयुष्यातील धक्कादायक अनुभव शेअर केले आहेत.
नुकत्याच एका मुलाखतीत धुरंधर फेम अभिनेत्रीने शॅाकिंग खुलासा केला आहे. अभिनेत्री आयशा खानने (Ayesha khan) अतिशय वेदनादायक प्रसंग शेअर केला असून, यामुळे बॅालीवूडमध्ये खळबळ उडाली आहे.
तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाल्याचे अभिनेत्रीने सांगितले आहे. या घटनेबद्दल सांगताना अभिनेत्री भावूक झाली होती. “ऑनलाइन येणाऱ्या कमेंट्स जुन्या जखमा पुन्हा उघडतात. कधी कधी वाटतं, मी प्रसिद्ध नसते तर अशी घटना पुन्हा घडली असती,” असे विधानही अभिनेत्री आयशा खान हिने केले आहे.
धुरंधर या चित्रपटातील ‘शरारत’ या गाण्यात नृत्य करताना अभिनेत्री आयशा खान झळकली. या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान मासिक पाळी सुरू असल्याची प्रामाणिक कबुली तिने दिली होती. यामुळे तिला सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते. या ट्रोलिंगविषयी देखील अभिनेत्री बोलली.

Ayesha Khan
ट्रोलिंगवर बोलताना अभिनेत्री आयेशा खान म्हणाली, “मी साधा टॉप घातला किंवा स्कर्ट, लोकांना प्रत्येक गोष्टीत अडचण असते. काहीही पोस्ट करण्यापूर्वी मला शंभर वेळा विचार करावा लागतो. इतरांच्या घाणेरड्या विचारांमुळे मला माझ्या आवडींवर बंधनं घालावी लागतात, हे दु:खद आहे,” असे मत तिने व्यक्त केले. ‘मोजो स्टोरी’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावरून येणाऱ्या धमक्यांमुळे तिला भीती वाटत असल्याचे देखील अभिनत्री सांगितले. Ayesha khan
एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला इंस्टाग्रामवर दररोज अश्लील व्हॉइस नोट्स आणि मेसेज येत होते. धक्कादायक बाब म्हणजे मेसेज पाठवणारा अनोळखी नव्हता, तर सेटवर काम करणारा एक स्पॉट बॉयच होता. आयशाने तात्काळ ही बाब प्रोडक्शन टीम आणि तिच्या वडिलांना सांगितली. त्यानंतर संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. आयशाने केलेल्या धक्कादायक खुलाशांमुळे बॅालीवूडमध्ये खळबळ उडाली आहे.




