Pune Municipal Corporation Election Results : पुणे महापालिका निवडणुकीत सुरूवातीपासूनच भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र आहे. भाजपला अनेक ठिकाणी विजय मिळण्यास सुरूवात झाली असून, आता प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर पद्मावतीमधील निकाल हाती आला आहे. भाजपचे चारही उमेदवार या प्रभागातून विजयी झाले आहेत. ऐन महापालिका निवडणुकीत काँग्रेसमधून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या एका बड्या नेत्याचा पराभव झाला आहे. या धक्कादायक निकालाची जोरदार चर्चा पुण्यात सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या अगदी काही दिवस शिल्लक असताना काँग्रेसमध्ये असलेली आबा बागुल यांनी शिवसेना शिंदे यांच्यात पक्षात प्रवेश केला. मात्र, त्यांच्या वाट्याला पराभव आला आहे. विजयी उमेदवारांची नावे : महेश वाबळे भाजप 5000 मतांनी विजय. भोसले शैलजाभाजप 2595 मतांनी विजय सई थोपटे भाजप 2400 मतांनी विजय विना घोष भाजप 4000 मतांनी विजय पराभूत उमेदवार आबा बागुल अश्विनी कदम सुभाष जगताप यांचा पराभव.