नारायणपूर – गेल्या आठवड्यापासुन बेपत्ता आसलेल्या ११ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करुन तिची कुऱ्हाडीने निघृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात घडल्याची माहिती पोलिसानी दिली. संबंधित गुन्हात पडित मुलीच्या कुटुंबाच्या तक्रारीवरुन एका २४ वर्षीय आरोपीला आटक करण्यात आली आहे. सोनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील रहिवासी असलेली ही मुलगी ३१ डिसेंबरपासून बेपत्ता होती आणि रविवारी गावाकऱ्यांना तिचा मृतदेह जवळच्या कोसरा गावातील एका शेतात आढळून आला होता. तपासाअंती पोलिसांनी जिल्ह्यातील गुनेर गावातील रहिवासी असलेल्या आरोपीला अटक केली. आरोपी पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाच्या ओळखीच्या होता. आरोपीने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर गुन्हा लपवण्यासाठी तिची हत्या केली असे प्रथमिक तपासातुन समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने मुलीची हत्या करण्यासाठी कुऱ्हाडीचा वापर केल्याचे समोर आले आहे.संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू असुन वैज्ञानिक आणि तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत आणि तपास पूर्ण झाल्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.