धक्कादायक! धार्मिक ओळख लपवून हिंदू मुलीशी लग्न; नंतर धर्मांतराचा दबाव, हुंड्याची मागणी

देहराडून – उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यात एका मुस्लिम तरुणाने आपली धार्मिक ओळख लपवून एका हिंदू मुलीशी लग्न केल्याचा आणि तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्याचा दबाव आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी आरोपीला अटक केली.पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, मोनिश नावाच्या व्यक्तीने ‘मनिष चौधरी, अमित चौधरी यांचा मुलगा’ अशा खोट्या नावाने विवाह जुळवण्याच्या संकेतस्थळावर प्रोफाइल तयार केली होती.
त्यानंतर दोघांचे डिसेंबर 2024 मध्ये हिंदू रितीरिवाजानुसार लग्न झाले.लग्नानंतर मुलीला समजले की तिच्या पतीचे खरे नाव मोनिश आणि वडिलांचे नाव इर्शाद अहमद असून तो उत्तर प्रदेशातील मेरठचा रहिवासी आहे. सध्या तो उधमसिंह नगर जिल्ह्यातील दिनेशपूरच्या गायत्री व्हिला, जयनगर येथे वास्तव्यास होता.तपासात हेही निष्पन्न झाले की मोनिशचे यापूर्वीच एका मुस्लिम मुलीसोबत लग्न झाले आहे.
कार आणि दागिन्यांची मागणी..
हिंदू मुलीशी लग्न केल्यानंतर, मोनिश आणि त्याच्या कुटुंबीयांनी पीडित मुलीच्या कुटुंबाकडे 2 लाख रुपये रोख, कार आणि सोन्याचे दागिने यांची मागणी केली. त्याचबरोबर तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला. जेव्हा तिने विरोध केला, तेव्हा तिला मारहाण करण्यात आली आणि शिवीगाळ केली गेली, असे तक्रारीत नमूद आहे.
धर्मांतराचा दबाव..
पीडित मुलगी ही नानकमत्ता गावातील रहिवासी असून, तिने पोलिसांना सांगितले की, 21 फेब्रुवारी रोजी मोनिश व त्याच्या कुटुंबीयांनी तिला मारून घराबाहेर काढले. त्यांनी तिला जबरदस्तीने मांसाहार खाण्यास भाग पाडले, धर्मांतर न केल्यास जीव मारण्याची धमकी दिली.चौकशीदरम्यान मोनिशने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने खोटे नाव वापरून विवाह संकेतस्थळावर प्रोफाइल तयार केली आणि त्याच नावाने लग्न केल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी FIR दाखल करून आरोपी मोनिशला गायत्री व्हिला, जयनगर (दिनेशपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून) अटक केली असल्याचे जिल्हा वरिष्ठ पोलीस अधीक्षक मणिकांत मिश्रा यांनी सांगितले.त्याच्यावर BNS (भारतीय न्यायसंहिता) च्या कलम 69 (फसवणुकीने लैंगिक संबंध), 115(2) (हानी करण्याचा हेतू), 351(2) (गुन्हेगारी धमकी) आणि 352 (जानबुजून अपमान करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न) यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.




