Pune : डान्स टीचरला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी; आरोपीने व्हिडिओ शूटिंग केल्याचे तपासात उघड

पुणेः एका नामांकित शाळेत डान्स शिकवण्याच्या बहाण्याने डान्य शिक्षकाने मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना काही दिवसांपूर्वी कर्वेनगर भागात घडली होती. या घटनेमुळे शहरातून नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. ११ वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे सुरुवातीला समोर आले होते. यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता अजून काही विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार नराधम डान्स टीजरने केल्याचे निष्पन्न झाले. हा सगळा प्रकार शाळेत समुपदेशन सुरू असताना उघडीस आला. पोलिसांनी आरोपी डान्स टीचरला अटक केली असून त्याने अत्याचाराचे व्हिडिओ शूटिंग केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी न्यायालयाने डान्स टीचरला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ
मिळालेल्या माहितीनुसार, कर्वेनगर परिसरातील असलेल्या नामांकित शाळेत डान्स टीचरने विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात आणखी चार मुलांवर अत्याचार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीला दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. या वेळी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील नितीन कोंघे आणि तपास अधिकारी सहायक निरीक्षक रणजित मोहिते यांनी न्यायालयाकडे केली.
व्हिडिओ तयार केल्याचे आले समोर
आरोपी डान्स टीचरने मुलांवर लैंगिक अत्याचार करताना त्याचे व्हिडिओ तयार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. हे व्हिडिओ त्याने इतरांना पाठवण्याची धमकी दिली असल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यामुळे असे काही व्हिडिओ आरोपीने समाजमाध्यमात प्रसारित केले आहेत का ? तसेच आरोपीने आणखी काही गुन्हे केले आहेत का ? यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार आता १३ जानेवारीपर्यंत आरोपी डान्स टीचरची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात येणार आहे.
यामुळे प्रकार आला उघडकीस
गेल्या दोन वर्षांपासून आरोपी डान्स टीचरकडून शाळेतील मुलांवर लैंगिक अत्याचार केले जात होते. आरोपी डान्स टीजर हा शाळेतील सहावी, सातवीमधील मुलांना शाळेच्या बाथरुममध्ये नेत त्यांच्यासोबत अश्लिल चाळे करीत होता. एका मुलाला शारिरीक इजा झाल्यानंतर ही बाब त्याने आपल्या पालकांना सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आणखी तीन पालकांनी त्यांच्या मुलांसोबत असा प्रकार घडल्याची तक्रार दाखल केली. आरोपी डान्स टीचर विद्यार्थ्याच्या शरीराला जाणून बुजून हाथ लावत असे. एका ११ वर्षीय विद्यार्थ्याने त्याच्यासोबत घडलेला प्रकार समुमदेश सुरू असताना सांगितला. यानंतर त्याच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर हा घृणास्पद प्रकार सगळ्यांवर समोर आला.





