धक्कादायक घटना.! ट्रेनसमोर उडी मारून एकाची आत्महत्या
Updated On:

ठाणे – ठाणे जिल्ह्यात रविवारी एका तरुणाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे कोपर रेल्वे स्थानकावरील रेल्वे वाहतूक काही काळासाठी थांबली होती. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेपूर्वी तो व्यक्ती काही काळ प्लॅटफॉर्मवर इकडे तिकडे फिरताना दिसला होता.
तो सामान्यपणे वागत होता आणि त्याच्याकडे बॅग होती. अचानक तो प्लॅटफॉर्मवरून खाली उतरला आणि स्टेशनच्या पूर्वेकडे चालायला लागला. कल्याण टोकावरून एक एक्सप्रेस येताच त्याने रुळांवर उडी मारली.
यानंतर त्याला जखमी अवस्थेत शास्त्री नगर महापालिका रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तो ३५ वर्षांचा असल्याचे दिसून आले. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याच्याकडे कोणतीही सुसाईड नोट सापडली नूसन पोलीस अधिक तपास करत आहे.





