प्रभात वृत्तसेवा पिंपरी – दोन अल्पवयीन मुलींना जादा क्लासेसच्या नावाखाली बोलावून त्यातील अल्पवयीन मुलीचा शिक्षकाने विनयभंग केला.ही घअना शनिवारी (दि. १) दुपारी निगडीतील चाणक्य फाऊंडेशच्या खासगी क्लासेसमध्ये घडली.चेतन सुरेशराव चव्हाण (वय ४०, रा. इंम्पिरीयल हाइटस्, भारतमाता हौसिंग सोसायटी, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत १७ वर्षीय मुलीने याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चेतन चव्हाण याने फिर्यादी आणि तिच्या मैत्रीणीला जादा क्लासेससाठी शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास बोलविले. त्यानंतर मैत्रीणीला रसायनशास्त्राचा पेपर सोडविण्यासाठी देऊन चौथ्या मजल्यावर पाठविले. त्यानंतर थोड्या वेळाने ती मैत्रीण काय करते हे पाहण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला लिफटमध्ये नेऊन तिचा विनयभंग केला. त् यानंतर ती मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत बसली असता ऑफिस बंद करण्यासाठी खाली चल म्हणून तिच्या मागे लागला. तिने विरोध केला असता डोळे मोठे करून तिला दम देत पुन्हा लिफटमधून खाली येत असताना पुन्हा तिचा विनयभंग केला.तुला सोडविण्यासाठी घरी येतो असेही आरोपी चेतन चव्हाण म्हणत होता. मात्र मला मावशीकडे जायचे आहे, असे सांगून तिने सुटका करून घेतली. त्यानंतर घरी गेल्यावर तिने घडलेला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर वडिलांनी निगडी पोलीस ठाणे गाठत याबाबत गुन्हा दाखल केला.काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या निगडी शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला. तर गेल्या महिन्यात महापालिकेच्या वाल्हेकरवाडी येथील शाळेतही १० वर्षीय मुलीचा विनयभंग शिक्षकाने केला होता. गेल्या काही दिवसांमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासण्याचे काम काही शिक्षकांकडून सुरू आहे.