Hiv aids । त्रिपुरातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. राज्यातील तब्बल 828 विद्यार्थ्यांना एचआयव्हीचे ( Hiv aids ) निदान झाले आहे. त्यापैकी 47 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एचआयव्हीग्रस्त अनेक विद्यार्थी देशातील विविध राज्यांतील विद्यापीठे किंवा मोठ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण घेत आहे. त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी -TSACS च्या आकडेवारीनुसार, राज्यातील 828 विद्यार्थ्यांना एचआयव्ही संसर्गाची पुष्टी झाली आहे. एड्स कंट्रोल सोसायटीने एचआयव्ही संसर्गासाठी 828 विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. त्यापैकी 47 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. TSACS ने राज्यातील 220 शाळा, 24 महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थी ओळखले आहेत जे अंमली पदार्थांच्या व्यसनासाठी इंजेक्शन वापरतात. त्रिपुरा जर्नालिस्ट युनियन, वेब मीडिया फोरम आणि TSACS यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यशाळेत TSACS च्या सहसंचालकांनी ही आकडेवारी सादर केली. याबाबत माहिती देतांना ते म्हणाले, ‘220 शाळा आणि 24 महाविद्यालये आणि विद्यापीठे शोधून काढण्यात आली आहे. जिथे विद्यार्थी अंमली पदार्थांच्या आहारी गेले आहे.’ Hiv aids । TSACS च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले… ‘मे 2024 पर्यंत आम्ही 8,729 लोकांची एआरटी-अँटीरेट्रोव्हायरल थेरपी केंद्रांमध्ये नोंदणी केली आहे. एचआयव्ही ग्रस्त ( Hiv aids ) लोकांची एकूण संख्या 5,674 आहे आणि त्यापैकी 4,570 पुरुष, 1103 महिला आणि फक्त एक रुग्ण ट्रान्सजेंडर आहे. एचआयव्ही ( Hiv aids ) प्रकरणांमध्ये वाढ होण्यामागे मादक पदार्थांच्या गैरवापराला जबाबदार धरून, टीएसएसीएसने सांगितले की, ‘बहुतेक प्रकरणांमध्ये, श्रीमंत कुटुंबातील मुलांना एचआयव्हीची लागण झाल्याचे आढळले आहे. अशीही कुटुंबे आहेत जिथे आई-वडील दोघेही सरकारी नोकरीत आहेत.’