धक्कादायक : नांदेडला सायंकाळी आणखी चार पॉझिटिव्ह रुग्ण सापडले !
Updated On:

नांदेडला सकाळी दोन रुग्ण सापडल्यानंतर सायंकाळी पुन्हा चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.चार पैकी तीन जण हे रहमतनगरचे असून एक जण माहुरचा आहे.
शहरातच कोरोनाची लागण झाली असताना ग्रामीण भागातही कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने कोरोनाने त्या भागातही हातपाय पसरवण्यास सुरुवात केल्याचे दिसते.
कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांची वाढत चालली असून माहुरमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तो कोणाच्या संपर्कात आला, तो बाहेरुन आला होता का किंवा अगोदरच्या कोरोना रुग्णांच्या निकटवर्तीयातील तो व्यक्ती आहे का? असे अनेक प्रश्न यानिमिताने उपस्थित केले जात आहे.





