Rohit Shetty House Firing : धक्कादायक! दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावर गोळीबार
Rohit Shetty House Firing : शनिवारी रात्री उशिरा अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या या गोळीबारानंतर बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण

Rohit Shetty House Firing : बॉलिवूडचे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. शेट्टी टॉवर्स बाहेर अज्ञातने चार राऊंड फायर केल्याची माहिती मिळत आहे.
शनिवारी रात्री उशिरा अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या या गोळीबारानंतर बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मुंबई पोलिसांचे क्राइम ब्रँच पथक व फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून घटनेचा तपास सुरू आहे.
तसेच पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. घटनेनंतर जुहू पोलिसांनी रोहित शेट्टी यांच्या बंगल्याबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. Rohit Shetty House Firing
View this post on Instagram
समोर आलेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टी यांच्या बंगल्याबाहेर रात्री उशिरा एक तरुण दुचाकीवरून आला. ओळख पटू नये म्हणून त्याने हुडी घातली होती. त्याने अचानक बंदुकीतून बंगल्याच्या दिशेने गोळ्या झाडल्या आणि दुचाकीवरून फरार झाला.
या गोळीबारात बंगल्याच्या खिडकीच्या काचांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, हा हल्ला नेमका कोणी आणि कोणत्या कारणाने केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे. Rohit Shetty House Firing
सलमान खानच्या घराबाहेर झाला होता गोळीबार
काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी अवघ्या काही तासात सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना अटक केली.
बिश्नोई टोळीकडून गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला धमक्या दिल्या जात होत्या. याशिवाय सलमानच्या घराची रेकी करण्यात आली होती. परंतु पुन्हा एकदा घडलेल्या या घटनेनंतर सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. Rohit Shetty House Firing
हेही वाचा :
PMC News : महापालिकेत ‘खांदेपालटा’चा हायव्होल्टेज ड्रामा; आयुक्तांवर नेमका कुणाचा दबाव?





