धक्कादायक.! होळी पार्टीत प्रसिद्ध अभिनेत्रीचा विनयभंग; अभिनेत्या विरोधात गुन्हा दाखल

Actress molested : बुरा ना मानो होली है…असं म्हणत 14 मार्च रोजी देशभरात धुळवड साजरी केली गेली. यावेळी सर्वजण वेगवेगळ्या रंगात रंगून गेले होते. सर्वत्र आनंदात, उत्साहाने धुळवड साजरी करण्यात आली आहे. कलाकार मंडळी देखील धुळवड साजरी करताना दिसत होते.
मराठी आणि हिंदी कलाकार मंडळींनी आपल्या कुटुंबासह, मित्रपरिवारासह धुळवड साजरी केली. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून कलाकारांनी चाहत्यांना धुळवडच्या शुभेच्छा दिल्या.
हिंदू धर्मातील एक प्रमुख सण धुळवड आहे. धुळवड सण रंग, प्रेम आणि वसंत ऋतुचे एक प्रतिक आहे. या दिवशी सर्वजण एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी करतात. त्यामुळे कलाकार मंडळीही रंगात रंगून गेल्याचं पाहायला मिळालं. मात्र, यावेळी एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. होळी पार्टीदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत छेडछाडीचा प्रकार घडला आहे.
होळीच्या दरम्यान मुलींवर फुगे फोडले जातात, इच्छा नसतानाही त्यांना रंग लावला जातो. यामध्ये अनेक विकृत संधी साधत महिलांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत असल्याचंही पाहायला मिळत. असाच काहीसा प्रकार अभिनेत्रीसोबत घडला आहे.
या प्रकरणी टेलिव्हिजन अभिनेत्रीनं अंबोली पोलीस स्टेशनमध्ये तिच्यासोबत गैरवर्तन, छेडछाडीचा प्रकार घडल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या आरोपांनंतर पोलिसांनी सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याविरोधात बीएनएसच्या कलम 75(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra | One of the TV actresses has filed a molestation case at Amboli police station in Mumbai. After the victim’s allegation, the police registered a case against the TV actor under section 75(1) of the BNS. The police have also recorded the statement of the accused TV…
— ANI (@ANI) March 15, 2025
त्याने मला चुकीचा स्पर्श केला…
पोलिसांनी पुढे बोलताना सांगितलं की, याप्रकरणी अभिनेत्रीनं ज्या अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत, त्या अभिनेत्याचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. अभिनेत्यावर होळी पार्टीत अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केल्याचा आणि तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केल्याचा आरोप आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टेलिव्हिजन अभिनेत्री 29 वर्षांची आहे. तिनं अनेक टेलिव्हिजन सीरिअल्स आणि मिनी सीरीजमध्ये काम केलं आहे. सध्या अभिनेत्री एका एन्टरटेन्मेट चॅनलसोबत काम करत आहे.
अभिनेता नशेत होता…
अभिनेत्रीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं की, तिच्या कंपनीनं छतावर होळी पार्टी आयोजित केली होती. 30 वर्षीय को-अॅक्टरही त्या होळी पार्टीत उपस्थित होता. तो दारूच्या नशेत होता. पुढे बोलताना ती म्हणाली की, तो माझ्यावर आणि पार्टीत उपस्थित असलेल्या इतर महिलांवर रंग फेकण्याचा प्रयत्न करत होता.
मला त्याच्यासोबत होळी खेळायची नव्हती, म्हणून मी विरोध केला आणि त्याच्यापासून दूर गेले. पण तो माझ्या मागे आला आणि माझ्यावर रंग फेकू लागला. मी माझा चेहरा झाकला, पण त्यानं मला जबरदस्तीनं धरलं आणि माझ्या गालावर रंग लावला. त्यानं मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला. त्यानंतर मी त्याच्या पासून लांब निघून गेल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे.





