Shocking | Doctor – राजस्थानमधील जालोरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आयुर्वेदिक रुग्णालयातील एका डॉक्टरचा जळून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मुरारीलाल मीणा हे रुग्णालयाच्या आवारात असलेल्या सरकारी निवासस्थानी राहत होते. ते घरात एका खोलीत धूम्रपान करत होते. सिगारेटमुळे खोलीला आग लागली असण्याची शक्यता आहे. घरातून धूर निघत असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून एफएसएल टीमला बोलावले. एफएसएल टीम या प्रकरणाची बारकाईने चौकशी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मुरारीलाल मीणा २०२१ पासून उम्मेदाबादमध्ये काम करत होते. डॉ. मुरारीलाल मीणा हे मूळचे जयपूरचे होते. आगीचे कारण पोलीस तपासत आहेत. रात्री उशिरा खोलीत आग लागली असावी असा अंदाज आहे. सोमवारी सकाळी घरातून धूर येत असल्याने लोकांना घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी डॉक्टरच्या कुटुंबाला माहिती दिली आहे. आगीत डॉक्टरांचे अर्धे शरीर जळून राख झाले. फक्त पायांचे काही भाग उरले होते.