धक्कादायक ! 8 वर्षीय चिमुरडयाची विहिरीत उडी मारून आत्महत्या
Updated On:

भाईंदर : आईने दुसरे लग्न केल्याच्या नैराश्यातून आठ वर्षीय मुलाने मंगळवारी सकाळी साडेसात वाजता विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. आठ वर्षीय मुलाला उत्तन येथील अनाथश्रमात सोडले होते. त्यानंतर त्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे.
मागील महिन्यात आई भेटायला आली असता “मला घेऊन चल आई, मला येथे नाही राहायचे” असे तो आई आणि संस्थेच्या लोकांना सांगत होता. मात्र आईने दुसरे लग्न केले होते आणि ती नालासोपारा येथे राहत असल्याने तिने मुलाला सोबत ठेवणे नाकारले.
त्यामुळे आई घेऊन जात नाही आहे म्हणून रात्री सर्व झोपी गेल्यानंतर बाजूला असलेल्या विहिरीत उडी मारून मुलाने आपला जीव संपवला आहे. या संस्थेत अनाथ लहान मुलांचे संगोपन केले जाते. काही महिन्यांपूर्वीच मुलाला संस्थेत दाखल केले होते. तो इतर २१ लहान मुलांसोबत तो संस्थेत राहायला होता.





