रशियाला झटका, अमेरिका युक्रेनला पाठवणार 800 अँटी-एअरक्राफ्ट, 9000 अँटी-आर्मर, 7000 शस्त्र

वॉशिंग्टन – रशिया दिवसेंदिवस युक्रेनवरील हल्ले तीव्र करत असताना आणि चर्चेतून कोणताही निष्कर्ष निघू शकत नसताना या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या बायडेन युक्रेनसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी मदत जाहीर केली आहे. हा त्या देशाने रशियाला दिलेला एक झटका मानला जातो आहे.
अमेरिकेने युक्रेनला अतिरिक्त 800 दशलक्ष सुरक्षा मदत जाहीर केली आहे. 800 अँटी-एअरक्राफ्ट सिस्टीम, 9 हजार अँटी-आर्मर सिस्टीम आणि 7 हजार लहान शस्त्रे जसं की शॉटगन, ग्रेनेड लॉंचर, ड्रोन या सर्व गोष्टी अमेरिका युक्रेनला पुरवणार असल्याची घोषणा जो बायडन यांनी केली आहे.
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी काही दिवसांपूर्वी जो बायडेन यांच्यासोबत झालेल्या चर्चेत अमेरिकेकडे शस्त्र पुरवण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने युक्रेनला आर्थिक मदतीसोबत लष्करी मदत करण्याचा देखील निर्णय देखील घेतला आहे.





