जीओच्या ग्राहकांना धक्का : ही मोफत सेवा केली बंद…

पुणे: सुरवातीला इनकमिंग आणि आउटगोइंग कॉलिंग मोफत देऊ केलेल्या जिओ कंपनीने त्यांच्या ग्राहकांना एक धक्का दिला आहे. जिओ ने सुरु केलेली मोफत आउटगोइंग सेवा आता बंद करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी आता पैसे आकारले जाणार आहेत.

टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये Interconnect Usage Charge संदर्भात बऱ्याच दिवसांपासून वाद सुरु होते. अलीकडेच जिओ नंतर एअरटेल ने आउटगोइंग कॅलची वेळ कमी केली आहे. पूर्वी हा कालावधी ४० सेकेंद होता तो आता कमी करून २० सेकंद करण्यात आला आहे.

जिओ ने असे जाहीर केल आहे की या पुढे जिओ ग्राहकांना आउटगोइंग कॉल साठी प्रति मिनिट ६ पैसे आकारण्यात येणार आहेत. परंतु जिओ ते जिओ आणि लँडलाईन वरील आऊटगोईंग साठी कुठलाही चार्ज आकारला जाणार नाही.
दरम्यान आऊटगोईंग साठी आकारण्यात येणाऱ्या चार्ज च्या किमतीचा इंटरनेट डेटा मोफत देण्यात येणार आहे. म्हणजे एका पद्धतीने हि भरपाईचा असल्याचं बोललं जात आहे.

जिओ ने मोफत कॅलिंग सेवा देऊ केल्याने त्यांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या आईडीया, वोडाफोन, एअरटेल या कंपन्यांना ट्राय च्या नियमानुसार १३ हजार ५०० कोटींची भरपाई द्यावी लागत होती. त्यामुळे आता ट्रायच्या नियमांपासून बचाव करण्यासाठी जिओने आउटगोइंग कॅल वर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.