मुंबई- जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांना आज हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
राज्यमंत्री शिवतारे यांना आज दुपारी हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवतारे यांना दोन वर्षांपूर्वी प्रकृती अस्वस्थामुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ईसीजी केल्यावर शिवतारे यांना तीन ते चार दिवसाअगोदर सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले होते तर एका उपोषणानंतर शिवतारे यांना किडनीचाही विकार असल्याचे निदान झाल्याने त्यांना प्रकृतीस्वास्थ्यचा सल्ला देण्यात आला होता.