Shivsena Vs Samata Party : मशाल चिन्हाबाबत 17 जुलैला सुनावणी; निर्णयाकङे संपूर्ण राज्याचे लक्ष…
Updated On:

नवी दिल्ली – शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी थेट पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला. यानंतर निवडणूक आयोगाच्या निकालानुसार शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्यात आले.
तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले. मात्र, ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या चिन्हावर समता पक्षाकडून दावा करण्यात आला आहे.
या चिन्हासंदर्भात समता पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता या प्रकरणावर पुढील सुनावणी 17 जुलै रोजी निश्चित करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला जे मशाल चिन्ह दिले आहे. ते आमच्या पक्षाचे चिन्ह असल्याचा दावा समता पक्षाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.
टॅग्स:





