Shivsena Symbol Hearing : शिवसेना कुणाची? पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Shivsena Symbol Hearing :

Shivsena Symbol Hearing : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेणार आहे. मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाची सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर होणार आहे.
हे प्रकरण कार्यतालिकेत 40 व्या क्रमांकावर शिवसेनेचे प्रकरण सूचीबद्ध आहे. मागील तीन वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. या सुनावणीत शिवसेना पक्ष आणि त्याचे धनुष्यबाण चिन्ह नेमके कोणाच्या ताब्यात राहणार, याबाबत महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
सध्या हा वाद एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि उध्दव ठाकरे यांच्या ठाकरे गटामध्ये सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपच्या पाठींब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते.
Pratap Sarnaik : मोठी बातमी! लवकरच राज्य परिवहन महामंडळात मेगा भरती; मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा
त्यानंतर शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी दोन्ही शिवसेना सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे.
आजच्या सुनावणीत शिवसेना पक्ष आणि त्याचे धनुष्यबाण चिन्ह नेमके कोणाच्या ताब्यात राहणार, याबाबत महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात न्यायालय कोणता निर्णय देणार, याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. Shivsena Symbol Hearing
हेही वाचा:






