ShivSena new song :’पक्ष आपला ठाकरेss, चिन्ह आपलं ठाकरेsss ‘दैवत आपलं ठाकरे”; टीझरनंतर आता ठाकरे गटाचे नवीन गाणे लाँच

Updated On:

ShivSena new song :  दरवर्षी प्रमाणे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दसरा मेळावा पार पडणार आहे. दरम्यान, या मेळाव्याची (Shiv Sena Dasara Melava 2023 ) तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde Dasara Melava) यांच्या दसरा मेळाव्यासाठी त्यांच्या गटाने कंबर कसली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटही तेवढ्याच उत्साहात तयारी करत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे गटाकडून पक्षाचे दसरा मेळाव्याचे नवीन गाणे रिलीज करण्यात आले आहे.

ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) अर्थात शिवतीर्थवर (Shivtirth Dasara Melava) होणार आहे.  काल ठाकरे गटाच्या मेळाव्याचा टिझर प्रसिद्ध झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दसरा मेळाव्याच्या निमित्ताने नवीन गाणेच लाँच (Shiv Sena new song) केले  आहे. ‘पक्ष आपला ठाकरे’ (Paksha Aapla Thackeray) अशा शब्दांनी या गाण्याची सुरुवात होते.

पक्ष आपला ठाकरेss, चिन्ह आपलं ठाकरेsss ‘दैवत आपलं ठाकरे’, असे गाण्याचे बोल आहेत. शिवसेनेतील फूट, बाळासाहेबांचे विचार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची वाटचाल याबाबत या गाण्यातून माहिती देण्यात आली आहे.

“ठाकरे ह्या नावाची ताकदच अशी आहे की ते नाव पाठीशी असल्यावर जगातल्या कुठल्याही आव्हानाला तोंड द्यायची शक्ती निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनगटात येते. कधीही न आटणारा उर्जेचा आणि मायेचा स्रोत म्हणजेच तमाम निष्ठावान शिवसैनिकांचं दैवत ‘ठाकरे’! ह्याच दैवतावरच्या प्रेमापोटी शिवसैनिकांनी अर्पण केलेलं हे नवीन गीत..’दैवत आपलं ठाकरे’!, असे शिवसेना ठाकरे गटाने म्हटले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...