Shivsena MLA Disqualification Result : निकालावर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “अपेक्षित पण…”

मुंबई – शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल कोणत्या गटाच्या बाजूने लागणार? याची सगळ्यांनाच उत्सुक्ता होती. आजच्या या निकालाकडे सगळ्या फक्त महाराष्ट्राचंच नाही तर देशांचं लक्ष लागलं होतं. अखेर हा निकाल समोर आला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे 16 आमदार पात्र असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचंही स्पष्ट केलंय. या निर्णयानंतर आता महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचा सहकारी पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे(पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर आमदार रोहित पवार यांची ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया समोर येत आहे.
रोहित पवार यांनी म्हटले आहे की, ” अपेक्षित पण अत्यंत दुर्दैवी निकाल! आता कोणत्याही दबावाशिवाय आधी सर्वोच्च न्यायालयातूनच संविधानाच्या बाजूने खरा न्याय मिळेल आणि नंतर लोकशाहीच्या माध्यमातून जनता जनार्दनालाच मतपेटीतून निर्णय घ्यावा लागेल! अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
अपेक्षित पण अत्यंत दुर्दैवी निकाल!
आता कोणत्याही दबावाशिवाय आधी सर्वोच्च न्यायालयातूनच संविधानाच्या बाजूने खरा न्याय मिळेल आणि नंतर लोकशाहीच्या माध्यमातून जनता जनार्दनालाच मतपेटीतून निर्णय घ्यावा लागेल!#ShivsenaUBT #MaharashtraPolitics
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 10, 2024
राष्ट्रवादी काँग्रेसचे(पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी याआधी ट्विटरव्दारे निकालावर फक्त पाच शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, “येह तो होना ही था ……”#ठाकरे, न्याया ची अपेक्षा कोणा कडून करता … जनता न्याय करेल.
येह तो होना ही था ……#ठाकरे
न्याया ची अपेक्षा कोणा कडून करता …
जनता न्याय करेल— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 10, 2024
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या आमदारांवर निकाल दिला आहे त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महेश शिंदे, अब्दुल सत्तार, भरत गोगावले, संजय शिरसाट, यामिनी जाधव, अनिल बाबर, तानाजी सावंत, लता सोनवणे, प्रकाश सार्वे, बालाजी किणीकर, संदिपान भुमरे, बालाजी कल्याणकर, रमेश बोनारे, चिमणराव पाटील, संजय रायमुलकर यांचा समावेश आहे.




