‘मोदी-मोदी म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना थोबाडीत द्या..’ ; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

Shivraj Tangadgi । कर्नाटकचे मंत्री आणि काँग्रेस नेते शिवराज तंगडगी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांच्या विरोधात आता भाजपने तक्रार दाखल केलीय. कोप्पल येथील निवडणूक रॅलीदरम्यान शिवराज तंगडगी भाष्य केले. शिवराज तंगडगी यांनी मोदींचे नाव घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थोबाडीत मारली पाहिजे असे वादग्रस्त विधान केले आहे.
‘मोदी-मोदी म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना थोबाडीत द्या ..’ Shivraj Tangadgi ।
शिवराज एस तंगडगी म्हणाले होते, ‘ते (भाजप) आता त्यांचा निवडणूक प्रचार घेऊन येत आहेत, त्यांना लाज वाटली पाहिजे. आता ते कोणत्या तोंडाने मते मागत आहेत? दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते, कोणाला नोकरी दिली आहे का? त्यांनी (तरुण) रोजगार मागितला तर ते (भाजप) त्यांना पकोडे विकायला सांगतात. त्यांना (भाजप) लाज वाटली पाहिजे. तरीही विद्यार्थ्यांनी मोदी-मोदीचा जप केला तर त्यांना थोबाडीत दिले पाहिजे” असे म्हटले होते.
तसेच पुढे बोलताना, ‘गेल्या 10 वर्षांपासून सर्व काही खोट्याच्या आधारे चालवले जात आहे. त्यामुळे त्यांना वाटते की ते पुढील पाच वर्षे जनतेला मुर्ख बनवू शकतात. PM मोदींनी भारतात 100 स्मार्ट शहरांचे आश्वासन दिले होते, ते कुठे आहेत? एकाचे नाव सांगा? असा सवाल त्यांनी केला.
काँग्रेस मंत्र्यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते अमित मालवीय यांनी, ‘तरुणांना लक्ष्य करणाऱ्या राजकीय पक्षांना सोडलेले नाही. कर्नाटक सरकारमध्ये सांस्कृतिक मंत्री असलेले काँग्रेसचे शिवराज तंगडगी यांनी पंतप्रधान मोदींच्या बाजूने घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना थोबाडीत मारण्याचे आवाहन केले. फक्त यंग इंडियाने राहुल गांधींना वारंवार नाकारले आहे, आणि पंतप्रधान मोदी यंग इंडियामध्ये गुंतवणूक करत आहेत आणि राहुल गांधींच्या काँग्रेसला त्यांना (तरुणांना) थोबाडीत मारायची आहे.
शिवराज तंगडगीचे वक्तव्य आचारसंहितेचा भंग Shivraj Tangadgi ।
भाजपने शिवराज तंगडगी यांच्या वक्तव्याला आचारसंहितेचा भंग असल्याचे म्हटले असून त्यांना निवडणूक प्रक्रियेपासून आणि काँग्रेसच्या बाजूने प्रचार करण्यापासून रोखण्यात यावे, असे म्हटले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सीटी रवी म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होणार आहे. काँग्रेसवाल्यांना याची जाणीव झाली आहे, त्यामुळेच ते रोज नवनवीन पायंडा पाडत आहेत.





