Shivraj Singh Chouhan and Kalyan Banerjee । गेल्या आठवडाभरापासून संसदेचे हिवाळी अधिवेशन गदारोळ आणि गोंधळाने गाजले होते. त्यानंतर आज दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीत सुरू झाले. दरम्यान, लोकसभेत केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान आणि तृणमूल काँग्रेसचे श्रीरामपूर, पश्चिम बंगालचे खासदार कल्याण बॅनर्जी एकमेकांना भिडले. कल्याण बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर आरोप केला की, बंगालला 2022-23 च्या अधिवेशनात सरकारकडून एकही पैसा मिळाला नाही.” त्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले. कल्याण बॅनर्जी यांनी कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांना प्रश्न विचारला की, “मनरेगा योजनेबाबत केंद्र सरकार वारंवार बेकायदेशीर काम झाल्याचा युक्तिवाद करत आहे? मंत्रिमहोदयांनी सांगावे कि या योजनेत कोणते बेकायदेशीर काम झाले?” असा सवाल यावेळी त्यांनी विचारला. टीएमसी अपात्र लोकांना पात्र बनवते Shivraj Singh Chouhan and Kalyan Banerjee । मनरेगा योजनेंतर्गत निश्चित रक्कम आहे, असे उत्तर शिवराज सिंह चौहान यांनी दिले. परंतु जेव्हा ही रक्कम निश्चित उद्देश पूर्ण करत नाही. त्यामुळे ते थांबवता येईल. पश्चिम बंगाल सरकार या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लोकांना अपात्र घोषित करत आहे. तर अपात्रांना पात्र ठरवले जात आहे. याअंतर्गत ठराविक लोकांना फायदा व्हावा या उद्देशाने मोठी कामे छोटी केली जात आहेत. “न खाऊंगा और न खाने दूंगा” Shivraj Singh Chouhan and Kalyan Banerjee । कल्याण बॅनर्जी प्रश्न विचारत म्हटले, केंद्र सरकार पश्चिम बंगालशी भेदभाव करत आहे. ज्याला उत्तर देताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, मोदी सरकारचे धोरण ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ आहे. मात्र त्याचा गैरवापर होणार नाही. पंतप्रधान मोदी हेही म्हणतात की ‘न खाऊंगा और न खाने दूंगा’ याशिवाय मनरेगाशी संबंधित काही प्रश्नांना उत्तरे देताना ग्रामीण विकास राज्यमंत्री चंद्रशेखर पम्मसानी म्हणाले की, ‘योजनेंतर्गत निधीचे वाटप होत नसल्याची चर्चा पूर्णपणे चुकीची आहे. तसेच योजनेंतर्गत मिळणाऱ्या मानधनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. दरवर्षी बजेटमध्ये 10-20 हजार कोटींची वाढ करण्यात आली.” अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. हेही वाचा चिन्मय दास यांच्या जामिनावर एका महिन्यानंतर सुनावणी ; कट्टरपंथीयांच्या भीतीने सर्व वकील गैरहजर