शिवनेरी ते किल्ले पुरंदर दिंडी सोहळ्याचे आयोजन
Updated On:

पेठ : ता. आंबेगाव येथे शंभूराजे दिंडी प्रस्तान सोहळ्याचे ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. भगवे ध्वज, बैलगाडी, तुतारीवादक, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सजवलेला रथ यामुळे पेठमध्ये उत्साह पाहायला मिळाला.
पेठमध्ये दिंडी सोहळ्याचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक गावातील वाकेश्वर मंदिरात आल्यावर अनेक शिवप्रेमीनी रथात विराजमान असलेल्या शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. या दिंडी सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे.
याप्रसंगी बाजीराव बांगर महाराज शामकांत निघोट, बहिरू निघोट, दिलीपराव पवळे, अशोक राक्षे,सोपाराव नवले ,शरद भोजने,गजानन बुट्टे,सुनील बुट्टे, संपत शिंदे आदी सहभागी झाले होते.




