Shivendrasinhraje Bhosale : एमआयडीसी विस्तारासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे सरसावले; ‘हे’ गाव होणार इंडस्ट्रियल हब
Shivendrasinhraje Bhosale : 'मास'च्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते धैर्यशील भोसले यांना नियुक्तीपत्र.

Shivendrasinhraje Bhosale – ‘मास’च्या माध्यमातून उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेच आणि भविष्यात सातारा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांसाठी जागा विस्तारासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याबाबत वर्णे जाधववाडी, अंगापूर भागातील डोंगराळ व नापीक पडीक जमिनी शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन एमआयडीसी होण्यासाठी व तिथे एखादा मोठा उद्योग आणण्यासाठी मुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
मॅन्युफॅक्चर्रस असोशिएशन आॅफ साताराच्या (मास) संचालक मंडळाच्या २०२६-२८ साठीची निवडणूक प्रक्रियेत अध्यक्ष व कार्यकारिणी संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. मासभवनात नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सभारंभ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘‘लिंब खिंड येथे ८४ एकरमध्ये आयटी पार्कचे काम लवकरच सुरु होत आहे.
टाटा टेक्नॉलॉजी सेंटर, जिल्ह्यासाठी लॉजिस्टिक पार्क अशा वेगवेगळ्या प्रकारे उद्योगपूरक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. उर्वरित काही विषय असतील ते मासचे नूतन अध्यक्ष धैर्यशील भोसले यांना सोबत घेऊन नक्कीच मार्गी लावणार आहे.’’ना. शिवेंद्रसिंहराजे मासच्या माध्यमातून उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून उद्योजकांच्या अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत.
भविष्यातही उद्योगविस्तारसाठी व इतर समस्या सोडविण्याबाबत शिवेंद्रसिंहराजे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार असल्याचे धैर्यशील भोसले यांनी सांगितले. मासच्यावतीने धैर्यशील भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे यांचा सत्कार केला. मास निवडणूक समिती चेअरमन दिलीप उटकुर यांनी निवडणूक निकालाचे वाचन केले. निवडणूक समिती सदस्य म्हणून राजेश कोरपे, उदय देशमुख, राजेंद्रकुमार मोहिते व संजोग मोहिते यांनी काम पाहिले.
ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करुन नवनिर्वाचित मास अध्यक्ष धैर्यशील भोसले यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे इतर पदाधिकारी व कार्यकारिणी संचालकांना शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली. मावळते अध्यक्ष संजोग मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. माजी अध्यक्ष उदय देशमुख यांच्या देशमुख उद्योगाला सीआयआयचा प्लॅटिनम ॲवार्ड मिळाल्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नूतन सचिव राहुल शिंदे यांनी प्रास्ताविक केले.नूतन उपाध्यक्ष नितीन माने यांनीआभार मानले.
‘मास’चे नवीन पदाधिकारी…
मास अध्यक्ष धैर्यशील भोसले, उपाध्यक्ष नितीन माने, सचिव राहुल शिंदे, खजिनदार केतन कोटणीस, सहसचिव आदित्य मुतालिक आणि संग्रामसिंह कोरपे. कार्यकारिणी सदस्य- जितेंद्र जाधव, भरत शेठ, अनुप मुथा, दीपक पाटील, सुहास फरांदे, ईशान मळेकर, प्रशांत शिंदे, गोपीचंद भोसले, आदित्य आहेरराव, नितीन तरडे, नीरज गांधी, सौरभ पवार, संजय सूर्यवंशी व केदार साखरे.






