Shivendrasinhraje Bhosale : वाई-महाबळेश्वर घाटाला नवा पर्याय! बोरगाव-भोसे मार्गाचे सर्वेक्षण; शिवेंद्रसिंहराजेंची मोठी घोषणा..वाचा
Shivendrasinhraje Bhosale : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून महाबळेश्वर-पाचगणी रस्ता मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन; पर्यटनाला नवी झळाळी देणार.

Shivendrasinhraje Bhosale – वाई-महाबळेश्वर घाटातील वाहतूक कोंडी आणि दरडींचा धोका लक्षात घेता एक महत्त्वाचा पर्याय आपल्या समोर आहे. त्यासाठी वाई-बोरगाव-भोसे-महाबळेश्वर या नवीन पर्यायी मार्गाचे सर्वेक्षण करून त्याचे काम मार्गी लावण्याबरोबराच महाबळेश्वर-पाचगणी रस्त्याचे रखडलेले काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ग्वाही यांनी दिली.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भिलार गटामध्ये भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा धडाका लावला आहे. भाजपचे संपर्कमंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भिलार येथे आयोजित जाहीर सभेत महाबळेश्वर तालुक्यासाठी विकासाचा नवा अजेंडा मांडला. केवळ आश्वासने नाही, तर स्थानिकांच्या जमिनीपासून ते पर्यटनाच्या जागतिक नकाशापर्यंत महाबळेश्वरचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे, अशा शब्दांत त्यांनी मतदारांना साद घातली.
या सभेला माजी आमदार मदन भोसले, चिन्मय कुलकर्णी, डी. एम. बावनळेकर, लक्ष्मी कराडकर, किसनशेठ भिलारे, अनिल भिलारे, वैभव कराडकर, तानाजी भिलारे, वैशाली भिलारे, योगेश भिलारे, चेतन पाटे, नदीम, ओम भिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती.ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले,
गावठाण विस्तार आणि बांधकामांना मिळणार संरक्षण मिळण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न हाती घेणार असून तालुक्यातील प्रत्येक गावाच्या सीमा वाढवणे आणि गावठाण विस्तार करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, स्थानिकांनी केलेल्या बांधकामांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी शासन स्तरावर ठोस पावले उचलली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्ट्रॉबेरी उत्पादकांसाठी ‘अच्छे दिन’
महाबळेश्वरची ओळख असलेल्या स्ट्रॉबेरी पिकाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी त्यांनी देशातील पहिला स्ट्रॉबेरी मॉल: भिलार येथे देशातील पहिला भव्य ’स्ट्रॉबेरी मॉल’ उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. हमीभाव आणि आयातसंदर्भात स्ट्रॉबेरीला योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून, रोपांच्या आयातीबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल.शेतकरी मॉल: विक्रीसाठी विशेष ’फार्मर मॉल’ची संकल्पना त्यांनी मांडली.
भिलारमध्ये ‘ग्लास ब्रिज’
पर्यटनाला चालना देण्यासाठी भिलारमधील वॉटरफॉल परिसरात ‘ग्लास पूल’ (काचेचा पूल) आणि रोपवे उभारण्याला प्राधान्य दिले जाईल. यामुळे पर्यटकांचा ओघ वाढून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. शेतकर्यांच्या पिकांचे वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी वनखात्याच्या जमिनींना आणि जंगलांना कुंपण घालण्याची महत्त्वाची घोषणा त्यांनी केली. यामुळे शेती सुरक्षित होण्यास मदत होईल.आमचा लढा हा विकासासाठी आहे. महाबळेश्वरच्या जनतेला सुविधा, सुरक्षा आणि समृद्धी मिळवून देण्यासाठी भाजप कंबर कसून तयार असल्याचे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.





