‘शिवरायांचा छावा’ फेम अभिनेत्याची बॉलीवूडमध्ये एन्ट्री

Bhushan Patil Bollywood Debut| ‘शिवरायांचा छावा’ या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता भूषण पाटीलने साकारली होती. त्यानंतर आता भूषणची बॉलीवूड चित्रपटात एन्ट्री झाली आहे. नुकतेच त्याने हिंदी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात देखील केली आहे. एका हिंदी चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
भूषण पाटील म्हणाला की,”आजवर मराठी सिनेमात अनेक भूमिका साकारल्या आणि त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. हिंदी चित्रपट विश्वात पदार्पण करणे हे माझ्यासाठी देखील आव्हानात्मक आहे. पहिला हिंदी सिनेमा आणि त्यात सुद्धा मुख्य भूमिका साकारायला मिळणं हे खूप भाग्याची गोष्ट आहे. बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे पण तेवढीच धाकधूक आहे. पण प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहणे हा माझा एकच हेतू आहे आणि म्हणून हिंदी प्रेक्षकांना सुद्धा मी आपलंसे करून घेईन ही आशा आहे.”
View this post on Instagram
भूषणच्या अभिनयाची जादू मराठीनंतर आता बॉलीवूडमध्येही कायम राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे. मात्र भूषण नेमक्या कोणत्या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. मात्र त्याच्या नव्या चित्रपटातबाबत चाहते देखील उत्सुक आहेत. Bhushan Patil Bollywood Debut|
भूषण त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतो. सोशल मीडियावर त्याचे फोटो तो नेहमी शेअर करताना दिसतो. त्याने ‘मनमौजी’, ‘पाहिले मी तुला’, ‘घे डबल ”बर्नी’, ‘ओळख माय आयडेंनटीटी’ या सिनेमांमध्ये तो झळकला आहे.भूषणने याआधी अनेक मराठी सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यानंतर आता बॉलीवूड पदर्पणासाठी सज्ज झाला आहे. Bhushan Patil Bollywood Debut|
हेही वाचा:





