Shivalik Sharma Century : तब्बल २० दिवस तुरुंगात काढले, पण हार मानली नाही! बडोद्याच्या शिवालिक शर्माचे अवघ्या ३९ चेंडूंत वादळी शतक
Shivalik Sharma Century : बडोद्याचा डावखुरा फलंदाज शिवालिक शर्माने मिझोरमविरुद्ध शानदार शतक झळकावले. बडोद्याने अवघ्या ६२ चेंडूंमध्ये १३४ धावांचे लक्ष्य गाठले.

Shivalik Sharma 39 Ball Century Syed Mushtaq Ali Trophy Baroda Beats Mizoram Jail Controversy : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या गट ‘अ’ मधील सामन्यात बडोद्याचा डावखुरा फलंदाज शिवालिक शर्माने आपल्या तुफानी फलंदाजीने संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रथम फलंदाजी करताना मिझोरामच्या संघाने २० षटकांत १३३ धावा उभारल्या होत्या; प्रत्युत्तरात बडोद्याने हे आव्हान अवघ्या ६२ चेंडूंतच सहज पार केले. या एकतर्फी विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो शिवालिक शर्मा, ज्याने केवळ ३९ चेंडूंत नाबाद १०१ धावांची अविस्मरणीय खेळी करत आपल्या टी-२० कारकिर्दीतील पहिलेवहिले विक्रमी शतक साजरे केले.
१८ चेंडूंत अर्धशतक, तर अवघ्या ३९ चेंडूंत खणखणीत शतक –
दुसऱ्याच षटकात सलामीवीर अमित पासी बाद झाल्यानंतर शिवालिकने मैदानावर येताच मिझोरामच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. त्याने अवघ्या १८ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतरच्या पुढील २१ चेंडूंत शतकाला गवसणी घातली. २५० पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने खेळताना त्याने आपल्या खेळीत ११ उत्तुंग षटकार आणि ५ खणखणीत चौकारांची आतिषबाजी करत सामना पूर्णपणे एकतर्फी केला.
२०२५ मध्ये २० दिवस तुरुंगात; हार्दिक-कृणाल पंड्याने दिली भक्कम साथ –
Another alleged fake rape case against a man 🚨🙏
He is IPL cricketer Shivalik Sharma. Last year, his ex-fiancée filed a rape complaint against him.
According to Shivalik, when their wedding was finalised, the girl’s family put all the wedding expenses on him and also raised the demand of living in a separate house so he refused to get married.
Later, his ex-fiancée allegedly filed a rape case against him and demanded ₹50 lakh from Shivalik to withdraw the case. However, Shivalik fought the case in a Rajasthan high court, and the court has now dismissed the case and cleared him of the allegations.
Shivalik also thanked Hardik Pandya and Krunal Pandya for supporting him during his difficult time.
— TEJASH 🚩 (@Tejashyy) September 29, 2026
शिवालिकसाठी हे शतक अत्यंत भावनिक आहे; कारण मे २०२५ मध्ये एका तरुणीने लग्नाच्या आमिषाने शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप करत तक्रार दाखल केल्याने त्याला २० दिवस तुरुंगात राहावे लागले होते. त्या अत्यंत कठीण काळात हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या आणि बडोदा क्रिकेट असोसिएशनने त्याला भक्कम पाठिंबा देत संघाबाहेर जाऊ दिले नाही.
सप्टेंबर २०२६ मध्ये न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता; मैदानावर दमदार पुनरागमन –
Century mayhem from Shivalik Sharma! 💯
🔥 He blasts an explosive 101 off just 39 balls against Mizoram, peppering the boundary with 11 towering sixes and 5 fours at a staggering strike rate of 258! 🚀🏏 Take a bow! 🙌 https://t.co/cINPGxMyhn
— CRIC WEEK (@cricweek) November 16, 2026
सप्टेंबर २०२६ मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने त्याच्यावरील सर्व गुन्हे आणि कायदेशीर कारवाई रद्द करत त्याला निर्दोष मुक्त केले; त्यानंतर मैदानावर परतताच शिवालिकने या ऐतिहासिक शतकासह जोरदार पुनरागमन करत टीकाकारांना बॅटने सडेतोड उत्तर दिले आहे.





